बीड मधील गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणार

1650

बीड तालुक्यात गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करणार असून पक्ष बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी जनसंपर्क वाढवावा यासाठी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शाखा स्थापन करण्याचा धडाका लावणार तर लवकरच गावनिहाय दौरा आयोजित करून जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते तातडीने सोडण्यात येतील असे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

गुरुवारी बीड तालुक्यातील 150 गावच्या सरपंच उपसरपंच यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे , डॉ योगेश क्षीरसागर , वैजनाथ तांदळे, बाजार समितीचे उपसभापती गणपत आप्पा डोईफोडे, सखाराम मस्के, बोबडे ,आदी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की येत्या काही दिवसातच संपूर्ण बीड तालुक्यात गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार आहे ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून पक्ष बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ योगेश क्षीरसागर म्हणाले की,  शेतकरी आणि जनतेची संपर्क साधून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा त्यातूनच पक्ष बळकट होण्यास मदत होणार आहे हे अभियान राबवत असतानाच शासनाच्या विविध योजना गावागावात पोहोचवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे शिवसेनेचा भगवा सप्ताह साजरा केला जाणार असून काही दिवसातच गावनिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉक्टर क्षीरसागर यांनी सांगितले यावेळी बीड मतदारसंघातील 150 सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती होती..

आपली प्रतिक्रिया द्या