उद्धव ठाकरे आज गेवराईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यासह बीड जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे.

गेल्या चार वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे बीड जिल्ह्यासह गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र परतीच्या पावसाने शेतकर्‍यांनी कष्टाने पिकवलेल्या पिकावर पाणी फिरवले. या परतीच्या जोरदार पावसाने शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी खचत आहेत. याची जाणीव ठेवून शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करता येईल त्यासाठी प्राधान्य देण्यात येईल ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने, शेतकऱ्यांनी खचून न जाता उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवावा आणि या दौऱ्यात आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहनही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.