उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह, महिलांचा केला सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात बीड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दिपा क्षीरसागर, आशा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरात भगवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’च्या माध्यमातून मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी चोळी देउन सन्मान करण्यात आला. जिल्हा भरात भगवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख व भागीरथी जाधव तसेच ता. प्रमुख शामल पवार उप शहर प्रमुख मधुमती शेजुळ यांच्या सह आदि महिलांनी प्ररिश्रम घेतले