
सामना प्रतिनिधी। वडवणी
महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचे राज्य आणण्याचे आहे , युतीचा भगवा विधिमंडळावर फडकावयाचा आहे त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे , शिवसेनेची शिस्त पुन्हा एकदा दाखवू, असे आवाहन संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी केले.
आंनद जाधव यांच्या उपस्थित आज शिवसेनेचा माजलगाव ,परळी व केज अंबेजोगाई मतदार संघात झंझावत निर्माण झाला. वडवणीत शाखा उद्घाटन व पदाधिकारी यांना मार्गदशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाखा उद्घाटन करताना संपर्क प्रमुख आंनद जाधव म्हणाले , पुढच्या पंधरा दिवसात प्रत्येक गावात आणि शहरातील वार्डात शाखा स्थापन करा ,शिवसेनेचा भगवा झंझावात असाच कायम राहिला पाहिजे आणि युतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले पाहिजे यासाठी शिवसैनिकांनी मतभेद बाजूला ठेवून शिवसेनेच्या शिस्तीचे दर्शन घडवले पाहिजे , गावागावात जा जनतेशी सवांद साधा, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या ,अन्यायाच्या विरोधात रान पेटवा, सामान्य जनतेला मदतीचा हात द्या , शिवसैनिक भेटला की नागरिकांना समाधान वाटले पाहिजे असे वागा दुष्काळात मदतीसाठी धावून जा , असा आदेश जाधव यांनी दिला यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत नवले बाळासाहेब अंबुरे ,चंद्रकला बांगर ,सुशील पिंगळे ,संदिप माने योगेश नवले ,विनायक मुळे , नागेश डिगे आदी उपस्थित होते.

































































