बीड जिल्हा परिषदेच्या चारही सभापतींची बिनविरोध निवड

1118

भाजपाच्या ताब्यात असलेल्या बीडच्या जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर शुक्रवारी चार विषय समितीच्या सभापतीपदी भाजपाने निवडणूकीत सहभाग न घेतल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व प्राप्त झाले. चारही सभापतींची निवड बिनविरोध झाली.
बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. भाजपाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी- काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीने भाजपाचे तीन सदस्य फोडून जिल्हा परिषद ताब्यात घेतली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत बाजी मारल्यानंतर शुक्रवारी सभापती पदाच्या निवडीमध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. ऐनवेळी भाजपाने या निवडणूक प्रकियेमध्ये सहभागच न घेतल्याने चारही सभापतीपदी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. जयसिंह धैर्यशिल सोळंके, कल्याण आबूज, सविता बाळासाहेब मस्के, यशोदाबाई बाबुराव जाधव या चौघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आपली प्रतिक्रिया द्या