बिहारमध्ये भिकेतून तयार केले बचत गट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या मुजफ्फरपूर येथील भिकाऱ्यांनी कोणतीही आर्थिक अडचण सहज सोडवता यावी यासाठी जिह्यातील 175 जणांना एकत्र करून बँकेसारखे पाच बचत गट सुरू केले. हे बचत गट व्यवस्थित चालावेत म्हणून हे भिकारी लोक दिवसभर मिळालेल्या पैशातून काही रक्कम यात जमा करतात. नुसते जमा करत नाहीत, त्यावर व्याजही मिळते. गरज पडलीच तर कर्जही. गरजू सदस्यास 1 टक्का व्याजाने दिले जाते.