
क्रूर हुकूमशहा म्हटलं की आपला प्रवास हिटलर पासून सुरू होऊन मुसोलिनी वर येऊन थांबतो. मात्र एक असाही होता, ज्याने हिटलरपेक्षा अधिक अत्याचार आणि लोकांचे जीव घेतलेत. तरीही आपल्याला त्याच नाव देखील माहीत नाही.
हिटलरने 60 लाख लोकांचा जीव घेतला अस म्हटलं जातं. तर या क्रूर राजाने आपल्या 23 वर्षाच्या काळात 1 कोटी ते 1.2 कोटी लोकांचे जीव घेतल्याचं म्हटल जात. अन्याय, अत्याचाराच्या सगळ्या सीमा याने पार केल्या आहेत. त्याच नाव म्हणजे किंग लिओपोल्ड 2.
आफ्रिका खंड नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे. ती संसाधनेच तेथील लोकांसाठी सगळ्यात मोठा श्राप ठरली आहेत. या संसाधनांच्या हव्यासापोटी अनेकांनी आक्रमण केली. तेथील लोकांनाच गुलामगिरीत ढकलल. सर्वप्रथम ब्रिटिशांनी व्यापारी दृष्टिकोनातून उत्तम असणारे सागरीतट असणारे प्रदेश ताब्यात घेतले. त्यानंतर अनेक युरोपीय देशांनी देखील प्रदेश ताब्यात घेतले.
मात्र काँगो प्रदेशावर कोणत्याच देशाने जास्त लक्ष्य दिलं नाही. कारण हा प्रदेश सागरी तटापासून दूर होता आणि मोठ्या प्रमाणात जंगलांनी वेढलेला होता. मात्र रबर आणि सोन्याची इथे मोठ्या प्रमाणात उपलब्धता होती. हीच गोष्ट बेल्जियमच्या लिओपोल्ड ने हेरली आणि त्याने काँगो मध्ये पाय रोवण्याचा निर्धार केला.
पण बेल्जियम सरकारचा गुलामगिरी आणि कोणत्याही देशाने काँगो प्रदेशात वसाहत स्थापन करण्यास विरोध होता. सरकारने आपल्याला विरोध करू नये म्हणून लिओपोल्डने त्यांना आश्वासन दिले की, मी तिथे जाऊन गरीब लोकांची काळजी घेईन. त्यांची योग्य ती सोय करून त्यांच्या योग्य त्या गरजा पूर्ण करेन. त्यासाठी बेल्जियम सरकारने पाठिंबाही दिला आणि पैसाही. जगाला दाखवण्यासाठी त्याने इंटरनॅशन आफ्रिकन सोसायटी ची स्थापना केली
लिओपोल्डने सुरुवातीला 3000 हजारच्या आसपास बेल्जियम मधील नागरिकांना काँगोत पाठवलं. पाठवताना लिओपोल्डने आदेश दिला होता की, तेथील लोकांना मारून क्रॉसवर लटकवा. त्यांच्या बायकांबरोबर संबंध प्रस्थापित करा, त्यांना आणि त्यांच्या मुलांना देखील मारून क्रॉस वर लटकवा. मिशीनरी देखील त्यांच्यासोबत होते. त्यांचं काम अत्याचार करून ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करणे होते.
लिओपोल्डच्या लोकांना माहीत होत इथ नैसर्गिक रबरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. पण ते रबर मिळवायचे कसं हे त्यांना माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी तेथील स्थानिक जमाती होत्या त्यांना संपर्क केला. त्यांच्याकडून रबर मिळवण्यास सुरुवात केली. त्याबरोबर बळजबरीने सोन उत्खनन करण्यास, हत्तींना मारून हस्तिदंत मिळवण्यास सुरुवात केली.
काही स्थानिक जमातीने त्याला पुरेपूर विरोध केला. पण लिओपोल्डने त्यांच्यातच भांडणे लावत गुलामगिरी चालू केली.(गुलामगिरीवर बंदी असतानाही) विरोध करणाऱ्यांना जिवंत जाळले. उपाशी ठेऊन भुकेने तडफडून जीव घेतला.
पुढे जाऊन काँगो प्रदेश पूर्ण माझ्या ताब्यात आहे, असं घोषित केलं. काँगो आणि काँगोतील लोक लिओपोल्डची खाजगी मालमत्ता झाली. येवढ्या मोठ्या प्रदेशावर लक्ष्य आणि वचक ठेवण्यासाठी लिओपोल्डने एक सेना स्थापन केली. यात अनेक काँगो लोक आणि बेल्जियमचे लोकं होते.
बेल्जियम सरकारचा विरोध होऊ नये म्हणून मी लोकांना काम देऊन त्यांच्या गरजा भागवतो आहे, असं भासवत सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. बेल्जियम सरकारला देखील पैसे देण्याचं मंजूर केलं.
स्थापन केलेली सेना बळजबरीने स्थानिक लोकांना गुलाम बनवू लागले. त्यांच्यावर अत्याचार करू लागले. काँगोतील लोकांनाच त्या लोकांवर अत्याचार करण्यास भाग पाडलं. अत्याचार करताना ते हात पाय तोडायचे, काटेरी चाबकाने मारायचे. जिवे मारत नसत, कारण जास्त प्रमाणात लोक मारल्यास त्यांच्यासाठी काम कोण करणार. त्या सेनेचा जो प्रमुख होता तो तुटलेले हात, पाय, डोक घरात सजावट म्हणून वापरत होता. त्याच पूर्ण घर तुटलेल्या अवयवांनी सजलं होतं. तुटलेल्या हातांचे आणि पायांचे नुसते ढेर जमा होत होते. लहान मूल, स्त्रिया, वृद्ध कुणालाही सोडत नव्हतं.
1900 नंतर बेल्जियम सरकारला आणि उर्वरित जगाला याची भणक लागू लागली आणि विरोध होऊ लागला.1908 मध्ये लिओपोल्डचा मृत्यू झाला. 1909 पर्यंत काँगो मधील अत्याचार बंद झाले. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना चैतन्य सावंत यांनी ही माहिती दिली.




























































