बेस्टच! भाडेवाढ नाही, थंडा थंडा कुल प्रवास!, 2236 कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासी भाडय़ात कोणतीही दरवाढ न सुचविलेला बेस्ट उपक्रमाचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा 2,236 कोटी 48 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प बेस्टने शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पात बेस्ट परिवहन विभागाचा तोटा 2,110 कोटी 47 लाख रु. आणि वीज विभागाचा तोटा 126 कोटी 1 लाख रु. एवढा दाखविण्यात आला आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना हा अर्थसंकल्प सादर केला. प्रवाशांना वायू आणि ध्वनी प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 2100 ई-बसगाडय़ांचा समावेश करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मार्च 2023 पर्यंत बेस्टचा 50 टक्के तर मार्च 2027 पर्यंत शंभर टक्के ताफा ई-बसगाडय़ांचा म्हणजे बॅटरीवर धावणाऱया गाडय़ांचा असणार आहे.

बेस्ट उपक्रमाचे सन 2022-23 चे अर्थसंकल्प अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. त्यात बेस्ट उपक्रमाचे एपूण अंदाजित उत्पन्न 4,997 कोटी 4 लाख रुपये तर खर्च 7,233 कोटी 52 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने बेस्टला 2,236 कोटी 48 लाख रुपयांची तूट येणार आहे. बेस्टच्या परिवहन विभागाचे उत्पन्न 1,451 कोटी 67 लाख रुपये तर खर्च 3,562 कोटी 14 लाख गृहीत धरला आहे. त्यामुळे परिवहन विभागाला 2,110 कोटी 47 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तर विद्युत विभागाचे उत्पन्न 3,545 कोटी 37 लाख तर खर्च 3,671 कोटी 38 लाख इतका अंदाजित धरण्यात आला आहे. तर विद्युत विभागाला 126 कोटी 1 लाख रुपये तोटा झाला आहे. बेस्ट उपक्रमाचा 2021-22 चा अर्थसंकल्प 1,887 कोटी 83 लाख रु. तोटय़ाचा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्या तोटय़ात 348 कोटी 65 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

200 ई-डबल डेकरचा समावेश

शहरातील वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात यापुढे केवळ विद्युत बसगाडय़ांचा समावेश करण्यात येणार आहे. बेस्ट आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 2100 ई-बसगाडय़ांचा समावेश करेल. यामध्ये 1400 एक मजली वातानुपूलित, 400 मिडी वातानुपूलित व 100 मिनी वातानुपूलित व 200 दुमजली ई-बसगाडय़ांचा चालकासहीत समावेश असणार आहे. यामुळे मार्च 2023 पर्यंत बेस्टचा 50 टक्के ताफा व मार्च 2027 पर्यंत 100 टक्के ताफा हा ई-बसगाडय़ांचा असेल.

तिकीट व पाससाठी डिजिटल पेमेंट प्रणाली

बेस्ट डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर सुरू करणार आहे. यामुळे कागदरहीत तिकीट व पासचा पर्यायासह ऑनलाइन पेमेंटचा प्रवाशांना पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच मोबाईल अॅपच्या प्रणालीद्वारे बस आगमनाची अचूक वेळ व कमी गर्दीची माहिती घेऊन प्रवासी आपल्या प्रवासाचे नियोजन सहज करू शकतील. महिलांच्या सुरक्षेकरिता एक विशेष पॅनिक बटण या मोबाईल अॅपमध्ये असणार आहे. तेजस्विनी बसेसच्या धर्तीवर गर्दीच्या मार्गांवर व गर्दीच्या वेळेत महिलांसाठी विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. विविध पंपन्या, का@ल सेंटर व शाळांकरिता विशेष बस चालवून उत्पन्न वाढविण्याची योजना आहे. मुंबई विमानतळ ते नरीमन पॉइंट व बीकेसी या ठिकाणी वातानुपूलित समर्पित ई-बससेवा सुरू करण्याबरोबरच शहरात 55 ठिकाणी पब्लिक ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.