बेदरकार चालकांना ‘बेस्ट’चा लगाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘बेस्ट’च्या बेदरकार ड्रायव्हरना लगाम घालण्यासाठी तिसऱयांदा तक्रार आली तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ‘शून्य अपघात’ मोहिमेत सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, गेल्या वर्षभरात मुंबईत ‘बेस्ट’च्या 61 अपघातांत आठ जणांचा मृत्यू झाला असून 54 जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय ‘बेस्ट’ ठरणार आहे.

लोकलनंतर ‘बेस्ट’ ही मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन आहे. सद्यस्थितीत सुमारे 30 ते 35 लाख प्रवासी ‘बेस्ट’ने प्रवास करतात.  सर्वात कमीत कमी तिकीट 5 रुपये करण्यात आल्याने प्रवासीसंख्या चांगलीच वाढली आहे. तर 6 रुपयांत एसी बसमधून प्रवास मिळत असल्याने मुंबईकर ‘बेस्ट’ प्रवासाला पसंती देतात. मात्र ‘बेस्ट’च्या बेदरकार ड्रायव्हरमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने इतर वाहनचालकांसह दुचाकीस्वार, पादचारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ‘बेस्ट’कडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

‘ओव्हरस्पीड’ची नोंद थेट पंट्रोल रूममध्ये

ओव्हरस्पीडमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘बेस्ट’च्या नव्या गाडय़ांमध्ये वेगाची मर्यादा 60 इतकी मर्यादित करण्यात आली आहे. शिवाय अतिवेगाने गाडी चालवल्यास त्याची माहिती पंट्रोल रूममध्ये स्वयंचलितरीत्या समजण्यासाठी ‘व्हेईकल ट्रेपिंग डिव्हाईस’ गाडय़ांमध्ये बसविण्यात आले आहे. यामध्ये अतिवेगाने, बेदरकारपणे गाडी चालवल्यास कारवाई करण्यात येते. प्रवासी, नागरिकांनाही बेदरकार ड्रायव्हरची तक्रार करण्याची सुविधा आहे.

प्रत्येक डेपोत ‘ऑक्सिडंट प्रिव्हेंशन’ व्हॅन

 प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘बेस्ट’च्या चालक-वाहकांना प्रशासनाकडून ‘ऑक्सिडंट प्रिव्हेंशन व्हॅन’च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अपघात का व कोणत्या स्थितीत, विविध ऋतूंमध्ये-सणांच्या वेळी अपघात कसे घडतात, हे अपघात कसे टाळावेत, गाडी चालवताना काळजी कशी घ्यावी, नियम यांची माहिती दिली जाते. दररोज एका डेपोत ही व्हॅन जात असते.

 पंत्राटदारांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱया चालकांनाही अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही प्रशासनाने सांगितले. तर वारंवार तक्रार येणाऱया ड्रायव्हरना सेवेतून निलंबित करण्यात येते. यामध्ये पंत्राटदाराच्या दोन ड्रायव्हरना अशाच प्रकारे निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.