
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकांच्या थकीत पगारामुळे वडाळा आगारातील काही कंत्राटी चालकांनी आंदोलन पुकारल्याने गेले दोन दिवस मिनी बस सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बेस्टने आपल्या ताफ्यातील बसेसच्या जादा फेऱया चालवून प्रवाशांना दिलासा दिला. वडाळा आगारातून एम.पी. ग्रुपच्या 63 पंत्राटी चालकांनी बसेस बाहेर न काढल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र अजूनही कंत्राटी बसचालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने उद्याही बसचा संप चालूच राहण्याची शक्यता आहे.
























































