
दारूच्या नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीच्या फ्रॅंकफ्रंट विमानतळावर लुफ्थांसा एअरलाइन्सच्या विमानातून खाली उतरवल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडून विरोधक स्पष्टीकरण मागत आहेत. आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना जर्मनीमध्ये घडली आहे. त्यामुळे आम्हाला प्रथम तथ्य तपासावे लागेल. मला पाठवलेल्या अपीलांच्या आधारे मी निश्चितपणे यात लक्ष घालेन, असे सिंधिया म्हणाले.





























































