भंडारा जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गायधने यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

भंडारा जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
– संजय रेहपाडे – सहसंपर्कप्रमुख (भंडारा जिल्हा), नरेश डहारे – जिल्हाप्रमुख (भंडारा जिल्हा).