भंडारा: कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मेंढा पोहरा येथील शेतकऱ्यांने नापिकी आणि बँकेच्या व उसनेवारीच्या कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. मृत शेतकऱ्यांचे नाव प्रदीप रामचंद्र दोनाडकर (45) असे आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.