
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी बावनकुळें यांना टोला लगावताना त्यांची तुलना ही वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कर्टली अँब्रॉशसोबत केली आहे.
”चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे असले तरी ते दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही, ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही, मग, ते कोणासारखे दिसतात, तर ते वेस्ट इंडिजचे खेळाडू अँब्रॉशसारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, अँब्रॉश कसे दिसत होते. तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही”, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

























































