व्हीपच्या कोंबडी हूलला आम्ही घाबरत नाही, भास्कर जाधव यांनी मिंधे गटाला सुनावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे गटाकडून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हीप बजावण्यात आला. त्यावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत आमदार भास्कर जाधव यांनी मिंधे गटावर टीका केली आहे. आम्ही यांच्या व्हीपच्या कोंबडी हूलला बिलकूल घाबरत नाही, असे त्यांनी मिंधे गटाला सुनावले आहे.

”उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या तेव्हाही आम्ही घाबरलो नाही. आता हे व्हीप बजावला हे सांगून आम्हाला घाबरवू पाहात आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे आम्ही यांना घाबरत नाही. मी ग्रामीण भागात राहतो. त्या ठिकाणी या वागण्याल कोंबडी हूल म्हणतात. अशा कोंबडी हूलला मी घाबरत नाही”, असं भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.