भय्यूजी महाराज आणि कोपर्डी प्रकरणाचा काय आहे संबंध?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी दुपारी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या वृत्तामुळे साऱ्या देशात एकच खळबळ उडाली. भय्यूजी महाराज आणि नगरमधील कोपर्डी प्रकरणाचा विशेष संबंध होता. कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर भय्यूजी महाराज २२ जुलै रोजी कोपर्डीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते.

कोण होते उदय सिंह देखमुख उर्फ भय्यूजी महाराज?

भय्यूजी यांनी कोपर्डी खटल्यातील कुटुंबीयांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी इंदूरला आपल्या आश्रमात नेले होते. यावेळी त्यांनी सर्वांवर उपचार केले होते. पीडित मुलीचा उर्वरित धार्मिक विधी उज्जैनला केला होता, तेव्हाही ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. भय्यूजी महाराज यांनी पीडित मुलीच्या आईला बहीण मानले होते.

… अजूनही विश्वास बसत नाही, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

‘कुहू कन्याधन सुरक्षा योजना’
कोपर्डीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांना दोन स्कूल बसेसही दिल्या होत्या. सूर्योदय परिवाराच्या वतीनं ‘कुहू कन्याधन सुरक्षा योजना’ या नावाने या बसेस देण्यात आल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श गाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार, मंत्री हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते.

‘ही’ पाहा भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट, ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या

पीडितेचे स्मारक उभारलं
भय्यूजी महाराज यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून कोपर्डीतील घटनेमधील पीडितेचे स्मारक उभारलं होतं. पीडितेचा एक पुतळा त्यांनी नाशिकमध्ये बनवला होता. भय्यूजी महाराजांच्या या स्मारकाला अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर या स्मारकाचे समाधीस्थळात रुपांतर करण्यात आले.

…म्हणून भय्यूजी महाराज यांना डी. लिटनं गौरवण्यात आलं होतं