
कोविडचा वाढता संसर्ग पाहता हायकोर्टाने मोहरमनिमित्त शिया मुस्लिम समाजातील बांधकांना भेंडी बाजार ते माझगाव कबरीस्थानपर्यंत ट्रकमधून मोहरमची मिरवणूक काढण्याचे आदेश दिले आहेत. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 ते 5.30 दरम्यान ट्रकमधून मिरवणूक काढावी. या ट्रकमध्ये केवळ 5 जणांना परवानगी असून शेवटचे 100 मीटर अंतर पाच भाविकांना पायी ताझिया घेऊन जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली. या पाच भाविकांनी आपले पत्ते मुंबई पोलिसांना द्यावेत, असेही खंडपीठाने म्हटले आहे. राज्यात मात्र मोहरमच्या मिरवणुकीवर बंदी असेल, असेही न्यायमूर्ती शाहरुख काथाकाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.


























































