भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला जामीन मंजूर

490

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चंद्रशेखर आझादला चार आठवडे दिल्लीत न येण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलन झाली. अनेक ठिकाणी अजूनही आंदोलनं सुरु आहेत. यादरम्यान दिल्लीतील दरियागंज, सीलमपूर भागात जामा मशिदीबाहेर चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद याला अटक केली होती.

मंगळवारी तीस हजारी कोर्टाध्ये चंद्रशेखर आझाद याच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांनी आझादविरोधात सहारनपूरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची माहिती मागितली. तसेच आझादने आतापर्यंत कोणते आपत्तीजनक विधान केले आहे? तसेच कोणीही आंदोलन करू शकते, आंदोलन करणे अपराध श्रेणीमध्ये येते का? असा सवाल कोर्टाने दिल्ली पोलिसांना केला. यावेळी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिल्ली पोलिसांना झापले असून विरोध प्रदर्शन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. तुमचे वर्तन असे आहे जसे काय जामा मशिद पाकिस्तानमध्ये आहे, असेही कोर्टाने म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या