
भिवंडीतील माणकोळी येथे प्लॉट क्र ए -8 मधील हरिहर कम्पाऊंडमध्ये असलेले दुमजली गोडाऊन कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात 1 कामगार ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.



























































