
काँग्रेस आमदार जोगिंदर पाल हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पठाणकोटमधील पाल हे भोआ मतदारसंघाचे आमदार आहेत. पाल यांच्या कृत्यामुळे पंजाबमध्ये आधीच संकटांनी घेरलेली काँग्रेस आणखी अडचणीत सापडली आहे. एका जाहीर सभेमध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओच व्हायरल झाला आहे.
पाल हे एका सभेमध्ये बोलत असताना एका तरुणाने सभास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अडवलं असता पाल यांनी त्याला अडवू नका असं सांगितलं. यानंतर त्यांनी या तरुणाला जवळ बोलावून घेतलं. तरुण जवळ येताच पाल यांनी त्यांच्या हातातला माईक या तरुणाकडे दिला आणि काय बोलायचं आहे ते बोल असं सांगितलं. यावर त्या तरुणाने पाल यांच्याकडे पाहात त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही गावासाठी काय केलंत?
So now Punjab Congress MLAs beating Punjabis for asking of not doing anything in 5 Yrs in PB.
Same voters who voted them to power based on Cong big promises in 2017.
Congress is no less than BJP in taking criticizm.pic.twitter.com/TjgPlUzPvk
— Gss (@Gss_Views) October 20, 2021
तरुणाच्या या प्रश्नामुळे संतापलेल्या पाल यांनी त्याच्या कानाखाली मारली. यानंतर पाल यांचे समर्थक आणि पोलिसांनी या तरुणाला धू-धू-धुतला आणि तिथून हाकलून दिला. हा व्हिडीओ नवरात्रादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच लोकांसमोर पाल आणि त्यांच्या समर्थकांनी या तरुणाला मारहाण करण्यात आली. उपस्थितांपैकी कोणीही या तरुणाला वाचवायला पुढे न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



























































