नवे ग्राहक जोडण्यात जिओ पुन्हा ‘नंबर वन’, ग्राहकसंख्या 19 लाखांनी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारातील दमदार पदार्पणानंतर रिलायन्स जिओसाठी मोबाईल ग्राहकांच्या आघाडीवरही आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सप्टेंबर महिन्यातील अहवालावर आधारित डीएएम कॅपिटल आणि आयआयएफएल कॅपिटलच्या विश्लेषणानुसार, मशीन-टू-मशीन कनेक्शन वगळल्यानंतर जिओच्या मोबाईल ग्राहकसंख्येत 19 लाखांची वाढ झाली आहे. यासोबतच जिओ पुन्हा एकदा नंबर वन टेलिकॉम कंपनी ठरली आहे.

जिओच्या तुलनेत एअरटेलच्या ग्राहकसंख्येत केवळ 2 लाखांची भर पडली. म्हणजेच जिओने एअरटेलच्या तुलनेत जवळपास 10 पट अधिक कोअर मोबाईल ग्राहक जोडले आहेत. मोबाईल ग्राहकसंख्येत एकूण 22 लाखांची वाढ झाली असून त्यातील जवळपास 86 टक्के वाटा एकटय़ा जिओचा आहे. सक्रिय मोबाईल ग्राहकांच्या बाबतीतही जिओने दमदार कामगिरी केली.