
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या पोलीस पथकावर (एसआय संजय दुबे, एएसआय अरविंद जाटव, कॉन्स्टेबल लोकेंद्र जोशी आणि कॉन्स्टेबल सुजन मीना) यांच्यावर हनुमानगंज पोलीस स्टेशन परिसरात चहा विव्रेत्याने हल्ला केला. पोलीस अधिकाऱयावर उकळता चहा फेकण्यात आला तसेच महिला व मुलांनी छतावरून दगडफेक केल्याने तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.
पोलीस स्टेशन हनुमानगंजचे निरीक्षक महेंद्रसिंग यांनी शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून रात्रीची कर्फ्यू असल्याचे जाहीर केले. यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने काझी पॅम्पमधील झहीर चायवाले याना दुकान बंद करण्याचे सांगितले. यामुळे पोलीस आणि झहीर यांच्यात वाद झाला. याप्रसंगी एएसआय अरविंद जाटव यांनी कठोर शब्दात झहीरला इशारा दिला यावेळी झहीरचा मुलगा शावेज यांने एएसआय अरविंद जाटव यांच्या अंगावर गरम चहाची केटली ओतली आणि त्यांना मारहाण केली.


























































