ऑक्सिजन लेव्हल 64; हिंमत न हरता जिंकली लढाई

कोरोना महामारीची दुसरी लाट जीवघेणी आणि धोकादायक ठरत आहे. या अशा परिस्थितीत पॅरालिसिस आणि ब्रेन हॅमरेज झालेले असताना मध्य प्रदेशमधील भोपाळचे रहिवासी असलेले 76 वर्षीय जवाहरलाल दुबे यांनी हिंमत न हरता कोरोनावर यशस्वी मात केली.

भोपाळच्या शास्त्रीनगरमध्ये राहणारे जवाहरलाल दुबे हे स्पाईन, पॅरालिसिस आणि ब्रेन हॅमरेजच्या त्रासाने त्रस्त होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. ऑक्सिजन लेव्हल 64 च्या खाली आल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. सुरुवातीला त्यांना 5 तास ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. दुसऱया दिवशी ही मागणी 12 तास झाली. दरम्यान, त्यांची पत्नी व मोठय़ा मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात पत्नीचे कोरोनाने निधन झाले. या परिस्थितीतही जवाहरलाल कोरोनातून बरे झाल्याची त्यांचा मुलगा सत्यार्थ दुबे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या