
जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भोर घाटानजीक एका खासगी बसला अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर 30 जण जखमी झाले आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मृतांमध्ये महिला आणि लहान मुलाचाही समावेश आहे. कराडवरून मुंबईच्या दिशेने येणारी ही बस भोरघाटात गारमाळ पॉईंटजवळ आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत गेली. अपघातस्थळी पोलिसांनी बचाव कार्य सुरू केलं आहे.
#UPDATE Maharashtra: Death toll rises to 5 in the incident wherein a bus driver lost control of his vehicle on old Pune-Mumbai highway, near Bhor Ghat, today. https://t.co/66aIgrx5qb
— ANI (@ANI) November 4, 2019
























































