महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मोठी कारवाई; नारायणगावातून 70 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नारायणगावात पुणे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जवळपास 70 जणांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत या प्रकरणातील सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.

परदेशासह देशातील इतर राज्यात झालेल्या छापेमारीनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामं पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं नारायणगावात धाड टाकली आणि एका इमारतीतून जवळपास 70 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे.

या संपूर्ण इमारतीत महादेव अॅपचं काम सुरू होतं धक्कादायक माहिती समोर आली. नारायणगाव पोलीस याचा तपास पुढील तपास करत आहेत.