
‘बडा बिझनेस’ने इस्कॉनच्या सहकार्याने यूटय़ूबवर आयोजित केलेल्या नेतृत्वविषयक व्याख्यानाच्या व्हिडीओला सर्वाधिक लाईव्ह प्रेक्षक मिळाल्याबद्दल नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किताब पटकावला आहे. ‘भगवद्गीते’च्या जोडीला ‘बिझनेस योगा’ या विषयावर 20 जून रोजी हा लाईव्ह व्हिडीओ होता. ‘बडा बिझनेस’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवसाय मार्गदर्शक विवेक बिंद्रा यांनी हा वेबिनार आयोजित केला होता. एकूण 1 लाख 55 हजार 449 प्रेक्षकांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला. या प्रकारच्या कार्यक्रमासाठी याआधीच्या जागतिक विक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपेक्षा ही संख्या 100 पट जास्त आहे. यामुळे दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत सलग सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ची कामगिरी करणारी ‘बडा बिझनेस’ ही आग्नेय आशियातली पहिली कंपनी ठरली आहे.




























































