
सामना ऑनलाईन । उरण
उरणच्या खारदांडा समुद्रकिनारी अक्राळ विक्राळ आकाराचा विचित्र मासा सापडला आहे. ३० ते ३५ फूटाचा हा मासा मृतावस्थेत आढळला असून त्याला पाहायला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. हा मासा कोणता आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
गुरुवारी सकाळी मच्छिमार जेव्हा समुद्रकिनारी जात होते त्यावेळी त्यांना समुद्रकिनाऱ्यालगतच्या झुडुपांजवळ एक आक्राळ विक्राळ मासा आढळून आला. समुद्राला भरती आलेली असताना हा मासा इथपर्यंत आला आहे. हा मासा कोणता आहे याबाबत मच्छिमारांना देखील काहीही माहिती नाही. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना कळविले असून लवकरच या माश्याला तेथून हटविण्यात येईल.






























































