सिद्धार्थ शुक्ला ठरला ‘बिग बॉस’चा विजेता

994

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीजनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 50 लाख रुपये आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर असीम रियाज आणि शहनाज गिल उपविजेते ठरले आहेत. अंतिम फेरीमध्ये सिद्धार्थ आणि असीमसह रश्मी देसाई, पारस छाबडा, आरती सिंह, शहनाज गिल हे टॉप 6 स्पर्धक दाखल झाले होते. दहा लाख रुपये घेऊन पारसने स्वतः या स्पर्धेतून बाहेर जाणे पसंत केले.

आपली प्रतिक्रिया द्या