
बिग बॉस 15 चा फिनाले अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही घरातील वाद काही संपताना दिसत नाही. बुधवारच्या भागात शमिता व तेजस्वीमध्ये जबरदस्त राडा झाला. तेजस्वीने शमिताला आंटी म्हटले त्यानंतर शमिताने तेजस्वी व तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राला चांगलेच सुनावले.
View this post on Instagram
बुधवारच्या भागात काही प्रेक्षक घरात आले होते. त्यांना स्पर्धकांना मत द्यायचे होते त्या मतांच्या आधारे घरातील एक स्पर्धक बाहेर जाणार होता. स्पर्धकांना प्रेक्षकांसमोर काही टास्क करायचे होते त्या टास्कच्या आधारे प्रेक्षक मतं देणार होते. शमिता व तेजस्वीला करण व प्रतीकला मसाज करायचा टास्क दिला होता. प्रतीक सर्वप्रथम मसाज करायला बसला. त्यावेळी तेजस्वीने मसाज करायला सुरुवात केली. त्यानंतर शमिता आली. ती थेट करणच्या पाठीवर चढून बसली व तिने मसाज करायचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाच तेजस्वीने तिचा पाय खेचून तिला टेबलवरून खाली काढले. शमिता करणच्या पाठीवर बसल्याने तेजस्वी भडकली होती. तिने तिला सुनावलं की हा करण कुंद्रा आहे. राकेश बापट नाही याआधी तु कधीच एवढ्या सिरियल्सी कोणता टास्क नव्हता केलास.
तेवढ्यावरच तेजस्वी थांबली नाही तिने शमिताला आंटी देखील म्हटले. ते ऐकून शमिता भडकली. तिने तेजस्वीला बडबडायला सुरुवात केली. त्यानंतर तिने करणला देखील तिच्या बाजूने न बोलल्याने त्याला देखील सुनावले. तेजस्वीने मात्र आपण मस्करी करत असल्याचे म्हटले.
दरम्यान आजच्या भागात प्रेक्षकांच्या वोटमुळे राखी सावंत घरातून बाहेर पडणार आहे. गुरुवारी सकाळी अनेकांना राखी घराबाहेर दिसली असून तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिचा पती राकेशची भेट घेतली.





























































