
बिग बॉस फेम अभिनेत्री आणि मॉडेल कशिश कपूर हिच्या घरी चोरी झाली आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानेच तिच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कशिश कपूर हिने मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 18 मध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेली कशिश कपूर ही मुंबईतील अंधेरी येथे राहते. तिच्या घरात काम करणाऱ्या नोकरीने 4 लाख रुपयांची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी कशिशच्या तक्रारीवरून सचिन कुमार चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन कुमार चौधरी हा गेल्या पाच महिन्यांपासून कशिशच्या घरी काम करत होता. सकाळी साडे अकरा वाजता तो कामावर यायचा आणि दुपारी एक वाजता निघून जायचा. याच दरम्यान त्याने घरातील कपाटातून पैशांवर हात साफ केला.
कशिशने अंबोली पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून, घरातील कपाटामध्ये तिने काही रोख रक्कम ठेवली होती. 6 जुलै रोजी तिने पाहिले तेव्हा कपाटात 7 लाख रुपये होते. मात्र 9 जुलै रोजी तिने बिहारमध्ये राहणाऱ्या आपल्या आईला पैसे पाठवण्यासाठी कपाट उघडले असता त्यात फक्त अडीच लाखांचीच रोड होती. जवळपास साडे चार लाख रुपये गायब होते.
शोधाशोध केल्यानंतरही पैसे सापडले नाही. त्याने तिने घरात काम करणाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी सचिन घाबराघुबरा झाला. खिसे तपासण्यासही त्याने नकाल दिला आणि नंतर तो फरार झाला. अखेर कशिशने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. क्राइम ब्रांचचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.