अबब! जगातील सर्वात मोठी कार!! 26 चाकं, 100 फूट लांब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात लांब कार कोणती याचं उत्तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे आहे. या गाडीला तब्बल 26 चाकं असून तिची लांबी शंभर फूट इतकी आहे. जगातील सर्वात लांब कार असलेल्या सुपर-लिमोझिनने सर्वात लांब कारचा स्वतःचाच वर्ल्ड विक्रम मोडीत काढला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 1986 मध्ये जे ओहरबर्ग यांनी कस्टमाइझ केलेली ‘द अमेरिकन ड्रीम’ ही कार आधी 60 फूट लांब होती, आता तिची लांबी वाढवून शंभर फुटांपर्यंत करण्यात आली आहे. या आलिशान कारमध्ये स्विमिंग पूल, जॅकूझी, मिनी-गोल्फ कोर्स, टीव्ही, फ्रीज अशा लक्झरी सुविधा आहेत.

मध्यंतरी ही गाडी अत्यंत वाईट अवस्थेत होती. तिच्या काचा, टायर फुटलेले होते. मायकल मॅनिंग नावाच्या व्यक्तीने ही गाडी विकत घेऊन तिला नवीन रूप द्यायला सुरुवात केली.

आर्थिक कारणामुळे त्याने 2019 साली डेझरलॅंड पार्क कार म्युझियमचा मालक मायकल डेझरला ही गाडी विकली. त्याचे फ्लोरिडा येथे वस्तुसंग्रहालय आहे. त्याने या गाडीला आधुनिक रूप दिले आहे. कारवर बांधलेले हेलिपॅड पाच हजार पौंड वजन सहन करू शकते. कारमध्ये 75 पेक्षा जास्त लोक फिरू शकतात.