
बिहारमध्ये नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल दहा वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार असून त्यांच्या जागी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे.
पीटीआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार, नितीश कुमार हे उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजप आणि जेडीयूमधील तडजोडीनुसार नितीश यांचे चिरंजीव निशांत कुमार हे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतील. नितीश कुमार हे गेल्या 20 वर्षांपासून बिहारच्या राजकारणात वर्चस्व राखून आहेत. नव्या घडामोडींमुळे बिहारमधील नितीशराज संपुष्टात येणार आहे.


























































