Bihar Cabinet Expansion – बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, निशांत कुमार यांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित सोहळ्यात भाजप, जदयू, एलजेपी (आर) आणि एचएएमच्या कोट्यातील 32 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचीही सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे.

सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाल्यानंतर 22 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. भाजपच्या कोट्यातून 15, जदयूमधून 13, एलजेपी(आर)मधून 2, एचएएम आणि आरएलएममधून प्रत्येक एका आमदाराने मंत्रि‍पदाची शपथ घेतली. गांधी मैदानावर आयोजित या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नितीश कुमार आदि प्रमुख नेते उपस्थित होते.

शपथ घेतलेले मंत्री

  • श्रवण कुमार
  • विजय कुमार सिन्हा
  • दिलीप कुमार जायसवाल
  • निशांत कुमार
  • लेशी सिंह
  • रामकृपाल यादव
  • नीतीश मिश्रा
  • दामोदर रावत
  • संजय सिंह टाइगर
  • अशोक चौधरी
  • भगवान सिंह कुशवाहा
  • अरुण शंकर प्रसाद
  • मदन सहनी
  • संतोष कुमार सुमन
  • रमा निषाद
  • रत्नेश सदा
  • कुमार शैलेंद्र
  • शीला कुमारी
  • केदार प्रसाद गुप्ता
  • लखेंद्र कुमार रौशन
  • सुनील कुमार
  • श्रेयसी सिंह
  • जमा खान
  • नंद किशोर राम
  • शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल
  • प्रमोद कुमार
  • श्वेता गुप्ता
  • मिथिलेश तिवारी
  • रामचंद्र प्रसाद
  • संजय कुमार सिंह
  • संजय कुमार
  • दीपक प्रकाश