नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागु चौहान यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

नितीश कुमार यांच्यासह 14 मंत्र्यांनीही शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही या वेळी उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यावर काँग्रेस आणि आरजेडीने बहिष्कार घातला.

आपली प्रतिक्रिया द्या