बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांना पाटणा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी लवकरच स्वस्थ होऊन निवडणूक प्रचारात परतणार, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

मागील दोन दिवसांपासून आपण आजारी असल्याचे सुशील मोदी यांनी सांगितलं. त्यांनी कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तब्येतीची योग्य निगा राखण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यादरम्यान जाहीर सभांमध्ये कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे

आपली प्रतिक्रिया द्या