Bihar Election Result 2025 – आज होणार बिहारचा फैसला

बिहारमध्ये सत्ता कोणाची याचा फैसला आज होणार आहे. बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होत आहे. मतचोरी आणि एसआयआर विरोधाच्या पार्श्वभूमीवर झालेले विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? एनडीए पुन्हा बाजी मारणार की तेजस्वी यादव मुसंडी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 व 11 नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मिळून विक्रमी 67.13 टक्के मतदान झाले. पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक होती. 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 72 लाख मते अधिक पडली. त्याचा फायदा कोणाला झाला हे शुक्रवारी कळेल. निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

  • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एकूण 46 मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून निवडणूक अधिकाऱयांनी आज तयारीचा आढावा घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.