जगातील समस्या संपेपर्यंत आंघोळ करणार नाही, बिहारच्या वासूकाकांचा निश्चय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील एका व्यक्तीने चक्क 22 वर्ष झाले एकदाही आंघोळ केलेली नाही. त्याच्या अंगाला भयंकर वास येत असल्याने लोकं त्याच्या आसपासही फिरकत नाही. असे असतानाही तो आंघोळ करायला मात्र तयार होत नाही. देशात महिलांवरील अत्याचार, पशू हत्या जेव्हा थांबतील तेव्हाच मी आंघोळ करेन असे त्या माणसाचे म्हणने आहे.

धर्मदेव राम असे त्या माणसाचे नाव असून तो 62 वर्षांचा आहे. धर्मदेव हा कोलकाता येथे एका चपलांच्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होता. मात्र 1987 साली अचानक एकाएकी त्याला आंघोळ न करण्याचे वेड लागले. महिनोंमहिने आंघोळ न केल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर तो पत्नीमुलांसोबत गावी येऊन राहू लागला. मात्र त्याच्या अंगाला येणाऱ्या वासामुळे कुणीच त्याच्या जवळ थांबायचे नाही. 22 वर्षात धर्मदेवने एकदाही अंगाला पाणी लावले नाही तरीही त्याला कोणताही आजार झालेला नाही ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटते.

पत्नी व मुलांच्या अंत्यसंस्कारानंतरही नाही केली आंघोळ

धर्मदेव राम यांची पत्नी माया हिचे 2003 साली निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्याची दोन्ही मुलं वारली. मात्र धर्मदेव यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केल्यानंतरही अंगाला पाणी लावले नाही.