जेडीयु आमदाराने भाजप आमदाराला म्हटले बैल, सुरक्षा देण्याची भाजप आमदाराची मागणी

बिहारमध्ये जदयू आणि भाजपचे संयुक्त सरकार आहे. पण मित्रपक्षातील दोन आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदाराने जदयू आमदाराच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. तसेच या आमदारापासून आपल्या जिवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली अहे.

मिळालेल्या माहितीनुसार जदयू आमदार गोपाल मंडल यांनी भाजप आमदार इंजीनीअर शैलेंद्र यांना फोन करून धमकी दिली होती. त्याचा ऑडियोही व्हायरल झाला होता. या प्रकरणी गोपाल मंडल यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना ते आपले छोटे भाऊ असल्याचे म्हटले होते.

भाजप आमदाराने पोलीस तक्रार केल्यानंतर जदयू आमदाराने त्यांच्यावर टीका केली आहे. गोपाल मंडल म्हणाले की बैलाला मारून काय होणार आहे, त्यात काय गुण असतात? निवडणुकीच्या पूर्वी ते विना सुरक्षा एका गाडीतून फिरत होते. आता त्यांना सुरक्ष हवी आहे म्हणून त्यांनी तक्रार केली आहे. आपण माफी मागायलाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या