प्रेमविवाहानंतर पत्नीला शिकवलं, शिक्षिकेची नोकरी लागताच तिचं मुख्याध्यापकासोबत सूत जुळलं

उत्तर प्रदेशमधील ज्योती मौर्य प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच बिहारमध्येही असाच प्रकार घडला आहे. प्रेमविवाहानंतर पतीने पत्नीला शिकवले, मात्र शिक्षिकेची नोकरी लागताच तिचे मुख्याध्यापकासोबत सूत जुळले आणि ती त्याच्यासोबर फरार झाली. त्यामुळे पतीने न्यायाची मागणी केली आहे. वैशाली जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

सरिता असे महिला शिक्षिकेचे नाव असून तिने चंदन नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. दोघांना दोन मुलंही आहेत. लग्नानंतर चदंनने सरिताची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला. पतीच्या पाठबळावर तिने टीईटीची परीक्षा पास दिली आणि पासही झाली. मात्र शिक्षिकेची नोकरी लागताच ती शाळेतील मुख्याध्यापकासोबत फरार झाली. राहुल कुमार असे मुख्याध्यापकाचे नाव असून आहे.

महापुरा गावचा रहिवासी असलेल्या चंदनने 13 वर्षांपूर्वी सरितासोबत प्रेमविवाह केला होता. बहिणीच्या सासुरवाडीमध्ये दोघांची भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी लग्न केले. त्यावेळी सरिता दहावी पास होती. लग्नानंतर सरिताने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी चंदनने अधिक मेहनत घेतली आणि तिला उच्च शिक्षण दिले.

पत्नीच्या शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून चंदन शेती करण्यासोबतच शिकवणी घेऊ लागला. सरिता टीईटी पास झाली आणि तिला शिक्षिकेची नोकरी लागली. फेब्रुवारी 2022मध्ये तिला समस्तीपूर जिल्ह्यातील शाहपूर पटोरी येथील प्राथमिक विद्यालय नोनफर जोडपूर येथे शिक्षिकेची नोकरी लागली. इथेच तिचे सूत मुख्याध्यापक राहुल कुमार याच्याशी जुळले. नोकरी लागून दीड वर्ष होत नाही तोच ती मुख्याध्यापकासोबत फरार झाली. त्यानंतर चंदनने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

दरम्यान, सरिता आणि चंदन या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी 12 तर छोटा मुलगा 7 वर्षांचा आहे. पत्नीचे मुख्याध्यापकासोबत सूत जुळल्यानंतर आपण मुख्यमंत्री, मुख्या सचिव, डीएम यांना पत्र लिहून कारवाईची मागणीही केली. मात्र यादरम्यान आपल्या घरी काही लोक आली आणि त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे चंदन याने सांगितले.