मृत्यूशय्येवरील आईने व्यक्त केली मुलीच्या लग्नाची चिंता, रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सोडवला गुंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील हाजीपूर येथील एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. हाजीपूर येथील सरकारी रुग्णालायत उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाची अंतिम इच्छा रुग्णालयात काम करणाऱ्या एका तरुणाने पूर्ण केली आहे. या महिलेने आपला जावई तिची सेवा करणारा असावा अशी इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर रुग्णालयातील कर्मचारीच तिच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार झाला. अंतिम इच्छा पूर्ण झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.

बिद्दूपूरच्या ककरहट्टा येथे राहणआऱ्या मानिका देवी 18 एप्रिल रोजी एका दुर्घटनेमध्ये गंभीररित्या भाजल्या होत्या. उपचारासाठी त्यांना हाजीपूर येथीर सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मुलगी प्रिती रुग्णालयात त्यांची देखभाल करत होती. याच रुग्णालयामध्ये काम करणारा आरोग्य कर्मचारी मनिंदर कुमार सिंह मानिका देवीची सेवा करत होता. ड्रेसिंग, तपासणी आणि औषधे देण्याचे काम करत होता.

मानिका देवी यांची प्रकृती गंभङीर होती. वैद्यकीय सेवा करणाऱ्या मनिंदर जवळ त्यांनी मुलगी प्रितीच्या लग्नाची चिंता व्यक्त केली. महिलेने मनिंदर याला मुलीशी लग्न करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. आपल्या रुग्णाची गंभीर प्रकृती आणि अंतिम इच्छेचा मान राखत मनिंदर यानेही मागचा पुढचा विचार न करता लग्नाला होकार दिला.

शादी के बंधन में बन गया पांच दिन का प्यार

उपचारादरम्यानच लग्नाची तयारी सुरू झाली आणि आरोग्यकर्मचारी, नर्स वऱ्हाडी बनले. मनिंदर आणि प्रितीचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. अवघ्या 15 दिवसांमध्ये लग्नाची तयारी पार पाडली गेली. मुलीचे कन्यादान केल्यानंतर मानिका देवी यांचे तब्येत बिघडली आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवील. मात्र मनिंदर याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

शादी के बंधन में बन गया पांच दिन का प्यार