स्मार्टफोनवर पॉर्न बघत चाळे करणे पडले महाग, तरुणाचा मृत्यू

2216

सामना ऑनलाईन। पाटणा

स्मार्टफोनमुळे आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला याच स्मार्टफोनवर कधी पबजी खेळताना तर कधी ऑनलाईन गेम ब्लू व्हेल खेळताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये मोबाईलवर पॉर्न फिल्म बघताना त्यातील तरुणीची नक्कल करताना एका तरुणाचा (34) जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पाटलीपुत्र भागातील नेहरु नगर येथे राहणारा हा तरुण मूळचा पश्चिम बंगालमधील आसनसोलचा रहीवासी होता. एका फार्मोस्युटीकल कंपनीत तो मेडीकल रिप्रेझेन्टेटिव होता. सोमवारी राहत्या घरात त्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत एका दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असे पोलिसांना वाटले. पण नंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल ऑन केला असता त्यात पॉर्न फिल्म सुरू असल्याचे आढळले. तसेच त्यात ज्या पद्धतीने एक तरुणी दोरीला लटकली होती. त्याच पोझिशनमध्ये तरुणाचा मृतदेह लटकलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पॉर्न फिल्ममधील तरुणी मान आणि पाय दोरीला बांधून करत असेल्या अंगविक्षेपांची हुबेहुब नक्कल करताना दोरीत मान अडकून तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या