बिहारमध्ये भीषण अपघात: बस, ट्रक आणि पिकअप व्हॅनची धडक; १० जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या कटिहार जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. बस, ट्रक आणि पिकअप व्हॅन या तीन वाहनांच्या झालेल्या धडकेत किमान १० जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

एएनआय (ANI) च्या वृत्तानुसार, हा भीषण अपघात कटिहार जिल्ह्यातील कोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेराबारीजवळ घडला. या अपघात १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या दुर्घटनेत आतापर्यंत १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सुमारे २५ जणांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे.”

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळावरील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात असून, विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.