
शहरासह परजिह्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणार्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश ओतान असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय धरपाळे यांनी तक्रार दिली आहे
कात्रजमधील दिगंबर हाईटस सोसायटीच्या पार्किंगमधून अजय धरपाळे यांची दुचाकी 23 ऑगस्टला चोरी झाली होती. याप्रकरणी दुचाकीचोर गुजरवाडी फाटा पसिरातील गॅरेजजवळ थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गणेश ओतान याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने भारती विद्यापीठ परिसरातून दोन, लोणंद फलटण, चतुःशृंगी, कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राजु वेगरे, तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली.




























































