महाराष्ट्राचे लाडके भाई येताहेत

78

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व… व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात. हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळते. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो. हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. ज्यांच्या साहित्यकृतींवर आजकर बरीच नाटके, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

महाराष्ट्राचे लाडके पु. ल.देशपांडे यांच्यावर वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचे आहे. चित्रपटामध्ये इरावती हर्षे हिने सुनीताबाईंची भूमिका साकारली आहे. या सोहळ्यास निखिल साने, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, शिवाजी साटम, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अभिजित देशपांडे, पूजा सावंत, अंकुश चौधरी, प्रिया बापट हजर होते.

आपली प्रतिक्रिया द्या