चुंबन दृश्यांमुळे मी आजारी पडायचे, बिपाशा बासूने सांगितला अनुभव

2239

बिपाशा बासू आणि तिचा नवरा करणसिंह ग्रोव्हर यांची मुख्य भूमिका असलेली ‘डेंजरस’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजच्या प्रसिद्धीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये बिपाशाने आपल्याला चुंबन दृश्यांची भीती वाटायची असं सांगितलं आहे. बॉलीवूडमधली हॉट अभिनेत्री अशी ओळख मिरवणाऱ्या बिपाशाने म्हटलंय की जर सहकलाकार हा तुमचा नवरा असेल तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतात. कारण अशावेळी दृश्ये चित्रीत करत असताना तुम्ही पहिले कलाकार असता आणि सोबतच तुम्ही नवरा बायकोही असता असं तिने म्हटलं आहे.

बिपाशाने म्हटलंय की तिला नवरा सहकलाकार असेल तर शारिरीक जवळीकीची दृश्ये करत असताना तणाव येत नाही आणि आजारीही पडायला होत नाही. यापूर्वी चुंबन दृश्ये देत असताना ती चित्रीत होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करायचे असं बिपाशाने म्हटलंय. ‘मला भीती वाटते, मला चक्कर येतेय. मला बरं वाटत नाहीये’ असं सांगून मी ही दृश्ये चित्रीत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे असं ती स्पॉटबॉयई ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.

बिपाशाने जोडी ब्रेकर या चित्रपटावेळचा अभुनव यावेळी सांगितला. ती म्हणाली की या चित्रपटात आर.माधवन हा तिचा सहकलाकार होता. माधवन हा माझा चांगला मित्र आहे, मात्र चित्रीकरणापूर्वी माझा प्रचंड थरकाप उडाला होता असं तिने म्हटलंय. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी आपल्याला हृदयविकाराचा झटका येणं बाकी होतं, प्रचंड थरथर जाणवत होती आणि मनात अस्वस्थता होती असं बिपाशाने सांगितलं आहे. माझ्या मित्रांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की माधवन सोबत हे दृश्य आहे आणि तो तुझा चांगला मित्र आहे. तो चांगला मित्र आहे हीच मोठी अडचण असल्याचं बिपाशाने त्यांना सांगितलं होतं. त्याच्यासोबत असले दृश्य चित्रीत करणं आपल्याला योग्य वाटत नव्हतं असं तिने सांगितलंय. मी कसंबसं चुंबनदृश्य पार पाडलं, आणि त्यानंतर सेटवरील सगळे जण मला हसायला लागले असं तिने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या