बिपाशा महिलांना देणार स्वसंरक्षणाचे धडे

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अक्षय कुमार नंतर आता अभिनेत्री बिपाशा बासू देखील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारे आहे. बिपाशा मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करणार आहे.

बिपाशाने सुरू करणार असलेल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये महिलांना मार्शल आर्ट्स व कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक कोर्सचा अखेरचा दिवस बिपाशा स्वत: महिलांकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. ‘मला स्वत:ला सुदृढ राहायला आवडते. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात कामाला जाणाऱ्या महिलांना फिटनेस राखता आला पाहिजे. या कोर्समधून त्यांना स्वसंरक्षणासोबतच स्वत:ला सुदृढ कसे ठेवायचे ते देखील शिकवले जाणार आहे’, असे बिपाशाने सांगितले.