देशात सहा राज्यात बर्ड फ्लू, दिल्लीत 16 पक्ष्यांचा अकस्माक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सहा राज्यांत बर्ड फ्लू असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तसेच या राज्यात फ्लू आटोक्यात आणण्यासाठी सरकारने निर्देश दिले आहेत.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि गुजरात या सहा राज्यात बर्ड फ्लू असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दिल्लीच्च्या हस्तसाल व्हिलेज आणि डीडीए पार्कमध्ये 16 पक्ष्यांचा अकस्माक मृत्यू झाला आहे. मृत पक्ष्यांचे नमूने प्रयोगशाळेत पाठवले असून याबाबत तपास सुरू आहे. केरळमध्ये दोन प्रभावित जिल्ह्यांमध्ये पक्षी मारण्याचा उपक्रम संपला असून राज्य फ्लू मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


हरयाणाच्या पंचकुलामधील दोन पोलट्री फार्ममध्ये एवियन एन्फ्लुएन्झा विषाणू आढळले आहेत. गुजरातच्या जुनागढमध्ये प्रवासी पक्ष्यांनाही फ्लूची लागण झाली आहे, तर राजस्थामध्ये अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरला आहे. यासाठी पशूधन आणि डेअरी विभागाने हा विषाणू रोखण्यसाठी सूचना दिल्या आहेत.