
सामना ऑनलाईन । बागपत
उत्तर प्रदेशमध्ये महिलाच नाही तर जनावरेही असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बागपत येथे एका कुत्रीवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने पोलीसही चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बबलू सिंह असे आरोपीचे नाव असून या घटनेनंतर तो फरार आहे.
३ जुलै रोजी कल्लू नामक ग्रामस्थ उसाच्या शेतातील कचरा आवरण्यासाठी गेला होता. त्यावेळी बबलू सिंह एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे त्याला दिसले. कल्लूने लगेच मोबाईलमध्ये ही घटना कैद केली व बबलूला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे हादरलेल्या बबलूने तिथून पळ काढला. हे कळताच बबलूच्या घरच्यांनी कल्लूच्या घरावर हल्ला करत त्याला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आणि ही घटना उघडकीस आली.
या घटनेशी साधर्म्य असलेली घटना गुजरातमधील बडोदा येथेही घडली होती. येथे काही लोकांनी गायींवर लैंगिक अत्याचार केले होते. यात एका गायीचा मृत्यू झाला होता तर दोन गायी जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर संपूर्ण भागात संतापाची लाट उसळली होती.


























































