नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद तीव्र; भाजप उमेदवार हिना गावीत अडचणीत

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद उफाळून आला आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचारापासून दूर असल्याने भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नंदुरबार लोकसभेतील उमेदवार बदलण्याची मागणी महायुतीच्या घटक पक्षांकडून करण्यात आली आहे. त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाने उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रचारापासून दूर राहण्याचे ठरविले आहे.