तडीपार गुन्हेगार भाजपच्या प्रचारासाठी मतदारसंघात

भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे पती माजी आमदार अनिल भोसले हे तडीपार असतानाही प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी केला आहे. त्यांनी अनिल भोसलेचे मतदारसंघात फिरत असल्याचे सीसीटीव्ही पुरावे जमा केले आहेत. पैशांची अफरातफरी आणि विविध गुन्हे दाखल असल्याने अनिल भोसले यांना तडीपार करण्यात आले आहे. शिवाजीनगर वाकडेवाडी या ठिकाणी फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यासंबंधीचे व्हिडीओ राजू पवार यांनी माध्यमांसमोर आणले आहेत.